Homeताज्या बातम्याSBI नं दिली नवीन माहिती ! डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाल्यास...

SBI नं दिली नवीन माहिती ! डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाल्यास कार्ड ब्लॉक करण्याची सांगितली पद्धत, जाणून घ्या (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाले तर काय करावे याबाबत एसबीआयने (SBI) एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समजावले आहे की, कार्ड हरवणे किंवा डॅमेज झाल्याच्या स्थितीत कशाप्रकारे ते ब्लॉक करावे (how to block sbi debit card) आणि कशाप्रकारे नवीन कार्डसाठी अप्लाय करावे (how to apply for sbi new debit card). या ट्विटमध्ये दोन टोल फ्री नंबर दिले आहेत, ज्यावर माहिती देऊन कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. ते नंबर आहेत 1800 112 211 आणि 1800 425 3800.

एसबीआयने कार्ड ब्लॉक करण्यासाठी सांगितल्या या पद्धती

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 1800 112 211 किंवा 1800 425 3800 नंबर वर कॉल करा.

जेव्हा सांगितले जाईल तेव्हा 0 बटन दाबा.

एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी दोन पर्याय सुचवते. पहिला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि डेबिट कार्ड नंबरवरून 1 बटन प्रेस करून कार्ड ब्लॉक केले जाते. दूसरा रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि अकाऊंट नंबरसह 2 बटन प्रेस करून कार्ड ब्लॉक केले जाते.

जर पहिला पर्याय निवडला तर डेबिट कार्डचे शेवटचे पाच डिजिट मोबाइलमध्ये टाका. यानंतर 1 बटन प्रेस करून कन्फर्म करा. दुसर्‍या पर्यायांतर्गत अकाऊंट नंबरचे शेवटचे पाच डिजिट टाकावे लागतील आणि कन्फर्म करण्यासाठी 1 बटन दाबावे लागेल.

कार्डसाठी रिअ‍ॅप्लाय कसे करावे

टोल फ्री नंबरवर कॉल केल्यानंतर 1 प्रेस करा.

नवीन कार्ड घेण्यासाठी डेट ऑफ बर्थ मागितली जाईल ती टाका.

यानंतर 1 प्रेस करून ते कन्फर्म करा.

कन्फर्म केल्यानंतर बँकेकडून एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल.

अशाप्रकारे काही दिवसानंतर नवीन कार्ड तयार होऊन तुमच्या पत्त्यावर येईल.

Web Title :- sbi tweeted a video giving out the details of the process of blocking and re applying of debit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI नं दिली नवीन माहिती ! डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाल्यास कार्ड ब्लॉक करण्याची सांगितली पद्धत, जाणून घ्या (व्हिडीओ)

Social News | या वर्षी साखरप्याची बाजारपेठ पुरात बुडाली नाही ! कोकणातील साखरप्याला गवसला पुरापासून मुक्तीचा मार्ग; जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News