ठाकरे सरकारला सुप्रीम धक्का ! सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे, केंद्र सरकारनं SC मध्ये सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेशन ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तूषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्रानं याचा स्विकार करत आता हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानं महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम असल्याचं सरकारकडून वेळावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र, आता केंद्र सरकारनचं प्रकरणाचा तपास सबीआयकडे सोपवल्याने मुंबई पोलिसांचा देखील नाईलाज होणार आहे.

अलीकडेच (दि 4 ऑगस्ट) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं होतं की, माझं सुशांतच्या वडिलांसोबत बोलणं झालं आहे. ते म्हणाले या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तर चांगलं होईल. आम्ही आजच या प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयकडे शिफारस करणार आहोत. कारण गेल्या काही दिसवांपासून लोकही सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आमचे आयपीएस अधिकारी मुंबईत गेले तर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं असंही ते म्हणाले होते.

सुशांतचं कुटुंब सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.