गुजरातमधील विद्यार्थी ‘यस सर’ ऐवजी म्हणणार ‘जय हिंद’ !

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमधील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना हजेरीदरम्यान ‘यस सर’ किंवा ‘प्रेजेंट सर’ ऐवजी ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणावे लागणार आहे. यासंबंधीचा आदेश गुजरात सरकारने सोमवारी जारी केला आहे.
गुजरातचे शिक्षण विभाग, गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संयुक्त निर्देशक बी एस राजगोर यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सर्व सरकारी, अनुदानित, खासगी शाळांमधील पहिल्या वर्गापासून ते १२ वीपर्यंतच्या वर्गांतील हजेरी दरम्यान विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणावे लागेल.
वर्ष २०१८ दरम्यान गुजरात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या कार्याच्या समीक्षेनंतर शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा यांनी हा आदेश दिला. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने १ जानेवारी २०१९ पासूनच यावर अंमलबजावणी करण्यातचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘सगळीकडेच फेल… त्यात राफेल’ : शिवसेनेचा २०१९ मधील मोदींवरचा पहिला हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us