जर्मनीत अशा उघडल्या शाळा, तुमच्या मुलांनाही फॉलो करावे लागतील ‘हे’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गामुळे लॉकडाऊननंतर आता जर्मनीतील शाळा उघडत आहेत. येथे शाळांमधील दृश्य पूर्णपणे बदलले आहे. मुलांच्या बसण्याच्या व्यवस्थेपासून अभ्यासाची पद्धत सर्वकाही बदलल्याचे दिसत आहे. कोरोना संसर्गानंतर म्हटले जात आहे की, भारतात सुद्धा काहीसे असेच बदल दिसून येणार आहेत.

जर्मनीत मुले थर्मल टेस्टनंतर क्लासरूममध्ये जात आहेत. त्यांच्यासाठी मास्क जरूरी करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना एकमेकांपासून दूर उभे राहूनच बोलण्याची परवानगी आहे.

स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर आणणे बंधनकारक आहे. विद्यार्थी ते काही तासाच्या अंतराने वापरतील. भारतात सुद्धा शाळेत सॅनिटायझर स्कूल बॅगमध्ये ठेवणे बंधनकारक होणार आहे. भारत सरकार सुद्धा असेच नियम तयार करत आहे.

वर्गात सॅनिटायझरचा योग्यवेळी वापर केला जात आहे. याशिवाय मुलांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सुद्धा सक्तीने पालन करण्याचे निर्देश आहेत. नोटीस बोर्डवर चित्रांद्वारे हे नियम समजावण्यात येत आहेत.

शाळेतील वर्ग योग्य प्रकारे सॅनिटाइझ केल्यानंतर अभ्यास सुरू करण्यात आला. मुलांना अभ्यासादरम्यान मास्क घालण्याचे आदेश आहेत. केवळ लंच टाइममध्ये ते मास्क काढू शकतात, परंतु लंच एकमेकांना शेयर करू शकत नाहीत.

ज्या विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी, इत्यादी कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांना शाळेत येण्याची परवानगी सध्या देण्यात आलेली नाही. भारत सरकारसुद्धा शाळा उघडण्यासाठी गाइडलाइन तयार करत आहे.

अशाप्रकारे क्लासरूममध्ये शिकवण्याची पद्धतसुद्धा बलल्याचे दिसत आहे. टीचर्स स्टूडेंट्सपासून नेहमीपेक्षा जास्त अंतरावरून शिकवत आहेत. टीचर्समध्ये लक्षणे असल्यास त्यांना शाळेत न येण्यास सांगितले आहे.

हनाऊ जर्मनीच्या कार्ल रेबेन स्कूलमध्ये असेच दृश्य दिसले. येथे विद्यार्थी आणि शिक्षक ठराविक अंतर ठेवून चालत होते. शाळा पुन्हा उघडल्यानंतर मुलांना पहिल्या दिवशी नियम सांगण्यात आले. सध्या त्यांना कोरोना संसर्ग थांबेपर्यंत हे नियम पाळावे लागणार आहेत.

शाळेत पहिल्या दिवशी मुलांना चांगले वाटावे म्हणून शाळा प्रशासनाने गेटवर येऊन मुलांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांची येथे प्रथम थर्मल टेस्ट करण्यात आली. जर भारतात सुद्धा शाळा उघडल्या तर दृश्य काहीसे असेच असू शकते. भारत सरकार शाळा कॅम्पसमध्ये बदल करण्यासाठी नवी गाइडलाइन जारी करत आहे.