देवाची करणी अन्… ! एकाच रोपात येताहेत 2 भाज्या; बटाट्याच्या रोपात वांगे अन् वांग्याच्या रोपात टमाटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या शहंशाहपूर येथे भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासातून विशेष प्रकारचे रोपटे लावले आहे. या रोपट्याची विशेषता आहे, की एकाच रोपात दोन वेगवेगळ्या भाज्या येतात. ग्राफ्टिंग मेथडच्या माध्यमातून बटाटा, वांगे एका रोपट्यात आणि टमाटे, वांगे एका रोपट्यात उगवले आहे.

वाराणसीच्या भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून एकाच रोपट्यामध्ये दोन भाज्यांची लागवड केली आहे. हे सर्व ग्राफ्टिंग मेथडच्या माध्यमातून केले जाते. त्यामध्ये टमाट्याच्या रोपट्यात वांग्याचे रोपटे देऊन हे रोपटे उगवले जाते. या प्रकारचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. आनंद बहादूर सिंह यांनी सांगितले, की अशाप्रकारचे विशेष रोपटे 24-28 अंश तापमानात 85 टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि प्रकाशाविना नर्सरीमध्ये तयार केले जाते. ग्राफ्टिंगच्या 15-20 दिवसानंतर त्याला फिल्डमध्ये पेरले जाते. त्यानंतर योग्य प्रमाणात पाणी आणि कापणी केली जाते. हे रोपटे पेरणीच्या 60-70 दिवसानंतर वाढत जाते.

ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर 2013-14 पासून
या ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर 2013-14 या वर्षापासून सुरु झाला होता. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. पण ज्या शेतकऱ्यांकडे पावसानंतरही अनेक दिवसांपर्यंत पाणी साठलेले असेल अशांना सर्वात जास्त फायदा होईल, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

शहरात राहणाऱ्या लोकांसाठी मिळणार रोपटं
या रोपट्यांचा वापर शहरात राहणाऱ्या त्या लोकांसाठी केला गेला आहे, ज्यांच्याकडे जागेची कमतरता आहे आणि ते बाजारातील रासायनिक मिश्रणाच्या भाज्यांपासून वाचू पाहतात आणि घरातच भाज्या उगवू पाहतात.