कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत शास्त्रांनी सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Delta Plus Variant | देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अजूनही हजारोच्या संख्येने कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. तर कोरोनाचा धोकादायक डेल्टा व्हेरिएंट (Delta Plus Variant) समोर आल्यानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) आढळणे चिंता निर्माण करणारे आहे. हा व्हेरिएंट दुसर्‍या लाटेतील डेल्टा व्हेरिएंटपेक्षा सुद्धा धोकादायक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंटला (Delta Plus Variant) ऑफ कन्सर्नच्या कॅटगरीत ठेवले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे जीनोम सिक्वेंन्सिंग करत असलेल्या शास्त्रज्ञांनी दिलासादायक बाब सांगितली आहे. द इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीकडून करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आयजीआयबीकडून 3500 लोकांच्या सॅम्पलचे सिक्वेंन्सिंगमध्ये सुमारे एक टक्का म्हणजे 40 लोकांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट मिळाला आहे. अशावेळी जीनोम सिक्वेन्सिंगकडून सांगण्यात आले की, आवश्यक नाही की डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल.

शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या सिनियर प्रिन्सिपल सायन्टीस अँड हेड, सायन्स क्यूनिकेशन अँड सायन्स डिसेमिनेशन डॉ. गीतावणी यांनी एका टीव्ही चॅनेलशी (हिंदी) बोलताना म्हटले की, डेल्टा प्लस व्हेरिएंट नुकताच समोर आला आहे यासाठी यावर अजूनही रिसर्च सुरू आहे.
लोकांवर करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या आधारावर पाहिले तर डेल्टा प्लस व्हेरिएंट खुप कमी लोकांमध्ये समोर आला आहे.
मात्र, अजून लॅबोरेटरी रिसर्च करणे बाकी आहे.
याचे ट्रान्समिशन किती टक्के जास्त आहे, याचा शोध घ्यायचा आहे.

डॉ. गीता म्हणाल्या, लॅबोरेटरी रिसर्चमध्ये अजून हे सुद्धा शोधायचे आहे की अँटीबॉडीवर या व्हेरिएंटचा कोणता परिणाम होतो किंवा व्हॅक्सीनेशनचा परिणाम या डेल्टा प्लसवर किती होतो.
तरीसुद्धा आयजीआयबीकडून ज्या लोकांचे जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आले आहे.
त्या डेटावरून समोर आले आहे की, हा धोकादायक आवश्य ठरू शकतो परंतु तिसरी लाट याच्यामुळे येईल हे सांगणे अवघड आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : scientists saying delta plus variant of covid 19 is dangerous in india but not liable for corona third wave as present deta

 

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’