Kolhapur News : ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया ; जिल्ह्यातील 12 तालुक्यांच्या EVM मशीनचे सील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम (EVM)मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ४३३ पैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने सध्या ३८६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठीच्या ईव्हीएम मशीनची तपासणी करून सील करण्यात आले. ही तपासणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. खराब व तांत्रिक बिघाड झालेल्या मशीन बाजूला काढण्यात आल्या. सोमवारी दिवसभर हातकणंगले आणि आजरा या दोन तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनची तपासणी व सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा रीतीने बाराही तालुक्यांसाठीचे मशीन सील करण्याचे काम संपले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.