सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सहकार मंत्री सुभाषदेशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. सेबीने त्यांना जोरदार हादरा दिला आहे. गुंतवणुकीचे ७५ कोटी रुपये परत नदिल्याने सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. लोकमंगल उद्योग समूह हा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा उद्योग समूह आहे.

सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाच्या गुंतवणूक दारांचे ७५ कोटी रुपये १६ मे २०१८ पर्यंत परत केले नसल्याने सेबीने हा कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल समुहाने गुंतवणुकदारांकडून घेतलेले ७५ कोटी रुपये तीन महिन्यांत परत करावेत, असे आदेश सेबीने दिले होते. मात्र हे पैसे विहीत कालावधीत परत करण्यात नआल्याने अखेर सेबीने लोकमंगल समुहावर कारवाई केली आहे. सहा महिन्यात लोकमंगल उद्योग समूहाने कसलेच उत्तर दिले नसल्याने सिबेने हि कार्यवाही केलीय आहे. लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी बरोबरच सुभाष देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख तसेच  वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील या लोकमंगलशी संबंधितांवर हि नोटीस बजावण्यात आली आहे. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दूध भुकटी बनवण्यासाठी ज्या प्रक्रिया उद्योगांच्या नावे अनुदान घेण्यात आले त्या चार संस्था बंद आहेत. तर एक संस्था अस्तित्वातच आणली नाही असे देखील दिसून आले आहे.  महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खोटे संमती पत्र देणे, बोगस बिगर शेतीचे प्रमाणपत्र, बांधकाम विभागाचे बनावट कागदपत्र या सर्व प्रकारामुळे त्यांची कंपनीच बनावट असल्याचे आता उघड झाले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर  प्रस्ताव सादर करून निधी लाटण्याचा प्रकार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे सोडून सरकार आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.