प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेच्या संपाचा दुसरा दिवस

अकाेला : पाेलीसनामा ऑनलाईन

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी कालपासून १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर गेले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला हाेता. दरम्यान राज्यभरातील सरकारी कर्मचारी संपावर असून आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपात अकोला जिल्हा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने देखील सहभाग घेतला आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’126b1002-9b08-11e8-8ab0-ef506965770b’]

हिवताप व हत्तीराेग विभागातील प्रयाेगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयाेगशाळा तंत्रज्ञ) या संवर्गावर सेवांतर्गत आश्वासित प्रगती याेजना (कालबध्द पदाेन्नती १२ व २४ वर्ष) तसेच पदश्रृंखलेमध्ये हाेणारी तफावत दुर करण्याबाबत सार्वजनिक आराेग्य विभाग मंत्रालय व सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय या विभागाने प्रस्तावास सन २०१६ या वर्षाला मान्यता दिलेली असून हा प्रस्ताव मुळ वेतन श्रेणी वाढीचा नसून हा प्रस्ताव १२ व २४ वर्ष कालबध्द ग्रेड पे चा आहे व हा प्रस्ताव आराेग्य विभागाने वित्त विभागाकडे सादर केला असता ७ व्या वेतन आयाेगाचे कारण समाेर करून ताे अद्याप पर्यंत प्रलंबित आहे व तसेच ह्या संवर्गातील पदाेन्नती (आराेग्य पर्यवेक्षक, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, हिवताप व हत्तीराेग अधिकारी) अद्याप पर्यंत प्रलंबीत असल्यामुळे, तसेच ७ व्या वेतन आयाेगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ लागू न केल्यामुळे आणि अंशदायी पेन्शन याेजना रद्द करून १९८२ ची परिभाषित पेन्शन याेजना नविन कर्मचाऱ्यांना लागू न केल्यामुळे राज्यातील हिवताप व हत्तीराेग विभागीतील प्रयाेगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्यामध्ये असंताेष निर्माण झालेला असल्यामुळे ते दि. ७, ८, व ९ ऑगस्ट राेजी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी संप पकारला आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’175f8691-9b08-11e8-bd60-2de469cb9fea’]

संपाच्या दुसऱ्या दिवशी निदर्शनामध्ये संघटनेचे व्ही एस वखरे, पि आर बयानी, के बी पांडे, अय्याज अहमद, के बी ठोंबरे, सि आर उपराथ, एस बी देशमुख,आर पी पांडे, सि एस तडस, अध्यक्षा के आर ठाकरे, ए एम मोहरील, वाय एस सरोदे, ए ए बलोदे, एन एस मावळे, एस पी सहारे, डी बी बरींगे यांनी सहभाग घेतला अशी माहिती संघटनेचे संघटक एस एस डोंगरे यांनी दिली.