कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना होताहेत ‘हे’ आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. अशातच कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक आणि मानसिक आजारही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास जाणवत होता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात. अशात आता कोरोना झाल्यानंतर डिप्रेशन आणि एंजायटी हा आजार सतावत असल्याचे समोर आले आहे.

सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मेंटल हेल्थ हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करणाऱ्यांमध्ये पोस्ट कोविड डिप्रेशन आणि एंझायटीच्या तक्रारींत वाढ केली आहे. यात केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा सारख्या राज्यातून येणाऱ्या कॉल्समध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 1800 -599- 0019 ही हेल्पलाईन सुरु केली होती. कॉल करणाऱ्यांच्या तक्रारीनुसार मानसोपचार तज्ज्ञांकडे हा कॉल फॉरर्वड केला जात होता. डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन विद डिसेबिलटीजच्यानुसार 16 सप्टेंबर 2020 ते 30 एप्रिलपर्यंत किरण हेल्पलाईनवरती 26 हजार 47 कॉल्स आले. ज्यात मार्च महिन्यात कॉल्सची संख्या 3617 होती. तर तीच सध्या एप्रिलमध्ये 3371 इतकी कमी झाली होती. परंतू केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा आदी राज्या ही कॉल संख्या वाढली होती. ती मार्चमध्ये 73 वरून एप्रिलमध्ये 170 वर गेली होती. हेल्पलाईनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाच्या दुस-या लाटेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. अधिकाऱ्याच्या मते, कोरोनाच्या दुस-या लाटेत केल्या गेलेल्या मेंटल हेल्थ हेल्पलाईनच्या प्रचारामुळे हे कॉल्स वाढले असावेत. केलेल्या कॉल्समध्ये सर्वात जास्त तक्रारी या कोरोनाच्या सध्याच्या परिस्थीतीबाबत होत्या. तर व्हॅक्सिनेशन, इमर्जन्सी सर्व्हिस याबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.