जाणून घ्या भारतातील कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार? तिसर्‍या लाटेचा धोका कधी? सरकारी पॅनलनं केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा सामना भारत करत आहे. या दरम्यान शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे स्थापन शास्त्रज्ञांच्या तीन सदस्यीय पॅनलद्वारे कोरोनाची दुसरी लाट केव्हा संपेल आणि तिसरी लाट भारतात कधीपर्यंत येईल याचा अंदाज जाहीर केला आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारतात कोविड-19 ची दुसरी लाट यावर्षी जुलैपर्यंत कमी होण्याची आशा आहे. जवळपास सहा ते आठ महिन्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. हा तीन सदस्यीय पॅनलने वर्तवलेला अंदाज आहे.

जूनमध्ये येऊ शकतात दररोज इतक्या केस
सूत्र (संवेदनशील, अनिर्धारित, चाचणी (सकारात्मक) आणि हटवलेले दृष्टिकोण) मॉडलचा वापर करत, शास्त्रज्ञांनी भविष्यवाणी केली की, मेच्या अखेरीस दररोज सुमोर 1.5 लाख कोरोनाची पॉझिटिव्ह प्रकरणे नोंद होतील आणि जूनच्या अखेरीस दैनिक आधारावर 20,000 प्रकरणे समोर येतील.

कोरोनाची तिसरी लाट ?
मॉडलनुसार, सहा ते आठ महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रभाव दर्शवण्यात आला आहे. प्रोफेसर अग्रवाल यांनी म्हटले, याचे स्थानिकीकरण होईल आणि जास्त लोक प्रभावित होणार नाहीत कारण लसीकरणामुळे प्रतिरक्षक होतील. त्यांनी म्हटले की, किमान ऑक्टोबर 2021 पर्यंत तिसरी लाट नसेल.

काय आहे सूत्र मॉडल
सूत्र मॉडल जसे गणितीय मॉडल महामारीच्या तीव्रतेचा अंदाज बांधण्यासाठी मदत करतात आणि यासाठी, धोरणात्मक निर्णयांना प्रभावित करतात. सूत्र मॉडल मागील वर्षी कोविडच्या मार्गक्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी अस्तित्वात आले होते. राष्ट्रीय कोविड -19 सुपरमॉडल समिती या मॉडेलचा वापर करते. या दरम्यान सरकारद्वारे भारतात कोविड -19 च्या प्रसाराबाबत अंदाज बांधण्यासाठी बनवण्यात आले होते. मात्र, समितीने मान्य केले की, ते देशात दुसर्‍या लाटेच्या प्रकृतीची भविष्यवाणी करण्यात असमर्थ ठरले.