जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त, ‘पुलवामा’च्या पार्श्वभुमीवर दहशतवाद्यांचा कट अयशस्वी

पोलीसनामा ऑनलाईन : जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आली आहेत. माहितीनुसार पुलवामा हल्ल्याच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते, सध्या सायंकाळी 4.30 वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील. यादरम्यान, नुकत्याच अटक झालेल्या दोन दहशतवाद्यांची माहिती देेेखील ते देणार आहेत.

यापूर्वी शनिवारी अनंतनाग पोलिसांनी सांबा परिसरातून द रजिस्ट्रेशन फ्रंटचा (टीआरएफ) दहशतवादी जहूर अहमद राठेरला अटक करण्यात आली. राठेरवर भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका पोलिस कर्मचाऱ्याच्या खूनाचा आरोप आहे. राठेरने पीओकेमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते आणि त्यानंतर राजौरी भागात घुसखोरी करून तो भारतात आला होता.

दहशतवाद्यांची भरती करण्यात आणि टीआरएफला शस्त्र पुरविण्यात त्याचा सहभाग होता. 2006 मध्ये त्याने शरणागती पत्करली परंतु 2020 मध्ये त्याने पुन्हा टीआरएफसाठी गुन्हे करण्यास सुरवात केली. पोलिसांनी त्याला अटक केली असूून चौकशी सुरु केली आहे.