वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या सदस्यपदी आनंद तांबे यांची निवड

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली असून थेऊर येथील आनंद विश्वनाथ तांबे यांची भजन व कीर्तन प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ही साहित्यिक व कलाकाराची खाण असून येथे अनेक नामवंत कलाकार जन्माला आले परंतु यातील अनेकांना वृद्धापकाळात खूप हालकीचे जीवन जगावे लागते अशा उपेक्षित कलाकार व साहित्यिक यांना शासनाच्या वतीने महिन्याला काही विशिष्ट मानधन देण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ही समितीनुकतीच गठीत केली आहे.

या समितीचे अध्यक्ष शशिकांत धोंडिबा कोठावळे हे असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत तर पालकमंत्री यांनी सुचवलेल्या तमाशा, शाहिरी, नाट्य, चित्रपट, भजन, कीर्तन, नृत्य, संगीत या क्षेत्रातील चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात भजन व कीर्तन प्रतिनिधी म्हणून आनंद तांबे यांची निवड झाली.

या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना आनंद तांबे म्हणाले की ही माझ्यासाठी सेवेची मोठी संधी आहे वारकरी संप्रदायात अनेक जण संपूर्ण जीवनभर समाजसेवेचे काम केले परंतु काही जणांच्या उतारवयात खूप हालकीचे दिवस येतात त्यांना शासन महिन्याला विशिष्ट मानधन देणार आहे त्यासाठी ही समिती गठीत केली आहे.