महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड; सुमंत वाईकर, वसंत गोखले आणि किशोर शिंदे या पुणेकरांचा समावेश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या (एमएए) विविध समित्यांवरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यात सुमंत वाईकर (Sumant Waikar) , वसंत गोखले (Vasant Gokhale ) आणि किशोर शिंदे ( Kishore Shinde) या पुणेकरांचा समावेश आहे.

संघटनेच्या घटना समिती चेअरमनपदी सुमंत वाईकर यांची निवड करण्यात आली. वसंत गोखले यांच्याकडे परीक्षा समितीच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तांत्रिक समिती चेअरमन पदावर किशोर शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि सचिव सतीश उचिल हे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघात महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत ॲड. अभय छाजेड तसेच दिनेश भालेराव / नारायण खडके हे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या विविध उपसमित्या आणि चेअरमन :
निवड समिती : होमियार मिस्त्री.
तांत्रिक समिती : किशोर शिंदे.
परीक्षा समिती : वसंत गोखले.
नियोजन आणि प्रशिक्षण समिती : राजीव जोशी.
सांख्यिकी समिती : सत्यरंजन मुदलियार.
वय पडताळणी समिती : रवी बागडी.
महिला समिती : ललिता बाबर.
शिस्तपालन समिती : रचिता मिस्त्री.
रोड रेस आणि मॅरेथॉन समिती : आनंद मेनेझिस.
अर्थ समिती : बाळाराम पाटील, श्रीकांत जोशी, ॲड. अभय छाजेड, गजानन घुगे, राहुल देशमुख.
आचारसंहिता समिती : रमेश बुट्टे.