‘प्रेमा’चा चहा महागात पडला ! लग्नाच्या आमिषाने महिलेने ज्येष्ठाला घातला 1 कोटीचा गंडा,

पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवत तसेच लग्नानंतर मी तुझी उतारवयात काळजी घेऊन असे सांगत एका भामटी महिलेने 73 वर्षीय वृध्दाला तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातला आहे. मुंबईमध्ये ही घटना घडली आहे.

जेरॉन डिसूझा असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. शालिनी सिंह असे या भामटी महिलेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, डिसूझा हे वित्तपुरवठा कंपनीसाठी कलेक्शन एजंट म्हणून काम करत होते. तर शालिनी ही एका खासगी बॅंकेत ग्राहक तक्रार निवारण केंद्रात कामाला होती. जेरॉन आणि शालिनीची ओळख 2018 मध्ये वांद्रेतील एका हॉटेलमध्ये झाली होती. दोघांनी तिथे चहा घेतला आणि त्यानंतर जेरॉनने शालिनीच्या खात्यात काही रक्कम जमा केली.

शालिनीने जेरॉनला लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी झुलवत ठेवल होते. अचानक शालिनी बेपत्ता झाल्याने जेरॉन बेचैन झाले होते. ती बेपत्ता झाल्यानंतर जेरॉन यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेंव्हा पोलिसांना समजले की लॉकडाऊन काळात ती तिच्याकडे असलेले सर्व पैसे घेऊन गावाकडे गेली होती. गावाला गेल्यानंतर तिने दिनेश सिंह याच्याशी लग्न केले होते. त्यानंतर जेरॉन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शालिनीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शालिनीसोबत दिनेशचेही नाव आहे. या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.