Senior Journalist Shirish Kanekar Passed Away | ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Senior Journalist Shirish Kanekar Passed Away | ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी (दि.25) सकाळी प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) शिरीष कणेकर यांचे निधन झाले. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Senior Journalist Shirish Kanekar Passed Away)

शिरीष कणेकर हे शैलीदार लेखक (Author) आणि फिल्मी गप्पांची मैफिल रंगवणारे बहारदार वक्ते होते. सिनेमा, क्रिकेट (Cricket) आणि राजकारण (Politics) यावरील त्यांचे वृत्तपत्रातील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्मबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत.(Senior Journalist Shirish Kanekar Passed Away)

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) एलएलबी (LLB) केली.
पत्रकार म्हणून त्यांनी इंग्रजी, मराठी वृत्तपत्रांतून (Newspapers) काम केले.
जवळपास सर्वच मराठी वृत्तपत्रांमध्ये कणेकर यांचे स्तंभलेखन (Column Writing) प्रसिद्ध होत होते. तसेच साप्ताहिकांमधूनही त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (Maharashtra Sahitya Parishad) उत्कृष्ट विनोदी वाड्:मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार (C V Joshi Award ) मिळाला होता.

शिरीष कणेकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण हे आहे.
त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर असल्याने त्यांचे बालपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात गेले.
कणेकर हे मराठीमधील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते.
क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी खूप लिखान केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लंबणीवर जाण्याची शक्यता, आमदारांनी केली ‘ही’ मागणी

Pune Railway Station | पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उपक्रमास सुरुवात; आता मिळणार 24 तास हॉटेलची सुविधा