Maharashtra Politics News | आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लंबणीवर जाण्याची शक्यता, आमदारांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | विधीमंडळाच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण (Shiv Sena MLA Disqualification Case) लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र शिवसेनेच्या 40 आमदारांनी नोटीसला उत्तर देताना मुदतवाढ मागितली आहे. (Maharashtra Politics News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठी ठाकरे गटाची (Thackeray Group) याचिका (Petition) विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकवेळा स्मरण पत्र देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीस दिली. (Maharashtra Politics News)

नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर देताना शिवसेनेच्या 40 आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे.
तसेच आणखी 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा येणे बाकी आहे.
विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ (Extension Time) देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, त्यामध्ये यासंदर्भात चर्चा झाली.

दरम्यान, ठाकरे गटाने जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या
याचिकांवर जलत सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश
दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले