Sensex Open Today 16 Dec 2020 : विक्रमी उंचीवर उघडला बाजार, निफ्टी 13650 च्या वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी सुरूवातीच्या व्यवहारात शेयर बाजारात विक्रमी तेजीसह व्यवहार सुरू होता. सुयवातीच्या व्यवहारात BSE चा 30 शेयर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 310.14 पॉईंटच्या मजबूतीसह 46,573.31 च्या स्तरावर उघडला. तर NSE चा 50 शेयर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी (Nifty) 95.25 पॉईंटच्या मजबूतीसह 13,663.10 च्या भावावर उघडला. सुरूवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 46,592.04 आणि निफ्टीने 13,666.45 च्या विक्रमी उंची गाठली होती.

मंगळवारी 9.71 अंकाच्या मजबूतीसह बंद झाला होता सेन्सेक्स
मंगळवारी बीएसईचा 30 शेयर्सचा सेन्सेक्स सुरूवातीच्या नुकसानीतून वर येत अखेरीस 9.71 अंक म्हणजे 0.02 टक्केच्या वाढीसह 46,263.17 अंकावर बंद झाला होता. अशाच प्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 9.70 अंक म्हणजे 0.05 टक्केच्या लाभातून 13,567.85 च्या स्तरावर बंद झाला होता.

कोणत्या शेयर्समध्ये तेजी आणि मंदीसह व्यवहार
सुरूवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा, इंडियाबुल्स हौसिंग, अपोलो टायर्स, कॅनरा बँक, पावर फायनान्स, गोदरेज प्रॉपर्टीज, युनाइटेड ब्रेव्हरीज, सेल, पावर फायनान्स, ओएनजीसी, मेरिको, बजाज फायनान्स, एल अँड टी फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, भारत फोर्ज, एल अँड टी फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियलमध्ये मजबूतीसह व्यवहार नोंदला गेला.

तर दुसरीकडे पीएनबी, जीएमआर इन्फ्रा, भारती इल्फ्राटेल, टोरेंट पावर, जी इंटरटेनमेंट, टाटा केमिकल्स, सन टीव्ही नेटवर्क, ब्रिटानिया, एचसीएल टेक, डॉ रेड्डीज लॅब्स, टेक महिंद्रा, भारती एयरटेल, बाटा इंडिया, टोरेंट फार्मा, श्रीराम ट्रान्सपोर्ट, हिंदुस्तान युनिलीव्हर, वोल्टासमध्ये घसरणीसह व्यवहार सुरू होता.