सप्टेंबरमधील पावसानं तोडलं गेल्या दहा वर्षांतील ‘रेकॉर्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे हळूहळू राजकीय वातावरण तापत असताना पाऊस मात्र त्याव पाणी ओतण्याचे काम करत आहे. थोड्याच दिवसांवर निवडणुकांचे वातावरण जोरात सुरु होणार आहे मात्र याचा राज्यात पडणाऱ्या पावसावर काहीही परिणाम दिसून येत नाही. यंदाचा पाऊस आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तोडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 यंदा सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने सप्टेंबरची सरासरी आताच ओलांडली आहे. यंदा गेल्या पंचवीस वर्षातील सर्वाधिक पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या आधी सन २०१६ मध्ये ७५६ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. हा विक्रम सोमवारच्या पावसाने मोडला.

सोमवारी दिवसभरात गोरेगाव, अंधेरी, पवई या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. या आधी सन १९९४ मध्ये सप्टेंबर महिन्यात ९०४.६ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता, तर सन १९५४ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे ९२० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. त्यानंतरचा हा सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे.

कुलाबा येथेही सप्टेंबरच्या दहा दिवसांमध्ये ४६८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ४, ५ आणि ८ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाने ही आकडेवारी वाढली. ५ सप्टेंबरला २४२ तर ८ सप्टेंबरला ११९ आणि ४ सप्टेंबरला ११८ मिलीमीटर पाऊस सांताक्रूझ येथे नोंदवला गेला. कुलाबा येथेही ४ सप्टेंबर रोजी १२२ मिलीमीटर पाऊस पडला होता.

या वर्षी नेहमीच्या सरासरीपेक्षा मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले सोमवारी पावसाने जरा विश्रांती घेतली होती मात्र नंतर तो पुन्हा सुरु झाला. अजून सप्टेंबर महिना पूर्ण झालेला नाही त्यामुळे मुबईकर अजूनही चिंतेत दिसत आहेत.निसर्गचक्र इतके कसकाय बदलू शकते असा प्रश्न मात्र सध्या निसर्गप्रेमींना पडत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like