शिक्षकांना सातवा वेतन आयोग एप्रिलमध्ये

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मार्चमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ आहे. मात्र साडेपाच लाख शालेय व पदव्युत्तर शिक्षकांना मात्र सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळणार आहे. त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन एप्रिलमध्ये मिळणार आहे.

राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची सुचना ३० जानेवारी रोजी काढली होती. त्यानुसार वाझीव वेतनाची वेतन बिले राज्याच्या विभागांनी कोषागार कार्यालयांकडे पाठविली. त्यामुळे त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचा (फेब्रुवारी पेड इन मार्च) मार्ग मोकळा झाला होता. परंतु लाखो शिक्षकांसाठी राज्य सरकारने अधिसुचना काढलीच नाही. त्यामुळे त्यांना मार्चमध्ये तो फायदा मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.