पुरुषांमध्ये सर्वप्रथम काय पहातात महिला, 9 पैकी सर्वात महत्वाचा ‘हा’ फॅक्टर; जाणून घ्या

नवी दिल्ली : पुरुष आणि महिलांच्या सेक्शुअल बिहेवियरबाबत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, पार्टनर बाबत पुरुष आणि महिलांची प्राथमिकता वेगवेगळी आहे आणि ती वयाच्या हिशेबाने बदलते.

स्टडीनुसार, तरुण पुरुष महिलांकडे शारीरीकदृष्ट्या जास्त आकर्षित होतात तर महिला पुरुषांमध्ये भावनात्मक संलग्नता शोधतात. एनसीए न्यूज वायरशी चर्चा करताना डॉक्टर स्टीफन व्हाईट यांनी म्हटले की, या स्टडीमध्ये अनेक जुन्या संशोधनाचे समर्थन करण्यात आले आहे परंतु पुरुष आणि महिलांच्या प्राथमिकता जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये बदलत जातात.

त्यांनी म्हटले की, 18 ते 40 च्या वयादरम्यान पुरुष आणि महिला एकमेकांच्या स्वरूपाच्या आधारावर जास्त आकर्षित होतात, जेव्हा त्यांची फर्टिलिटी पीकवर असते. परंतु हे वयाच्या सोबत कमी होत जाते आणि त्यानंतर लोक व्यक्तिमत्व आणि वर्तणूक सारख्या गोष्टींना प्राथमिकता देऊ लागतात.

डॉक्टर स्टीफन यांनी म्हटले, 20-30 वर्षाच्या वयात लोक लुक्स जास्त पसंत करतात. या संशोधनासाठी संशोधकांनी 18 ते 65 वर्षाच्या दरम्यानच्या हजारो ऑस्ट्रेलियन लोकांच्या डेटाचा अभ्यास केला. या सर्व लोकांनी सेक्स सर्वेमध्ये भाग घेतला होता.

संशोधकांनी सर्वेत भाग घेणार्‍यांकडून सेक्शुअल अट्रॅक्शनशी संबंधीत नऊ गोष्टींवर मत मागितले होते. या नऊ गोष्टी – वय, आकर्षण, शारीरीक ठेवण, बुद्धी, शिक्षण, उत्पन्न, विश्वास, खुलेपणा आणि भावनात्मकता संबंधी होत्या.

सहभागी व्यक्तींना विचारण्यात आले होते की, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून किती मर्यादेपर्यंत प्रभावित होता. तुम्ही त्यांना किती सेक्शुअल अट्रॅक्टिव्ह पहाता?. या प्रश्नांची उत्तरे त्यांना 0 ते 100 च्या प्रमाणात द्यायची होती.

डॉक्टर स्टीफन यांनी म्हटले, आम्हाला आढळले की, सेक्शुअल अट्रॅक्शनसाठी महिलांच्या तुलनेत पुरुष शारीरीक बनावटीला जास्त महत्व देतात. मात्र, उत्पन्नाला कमी महत्व देण्याच्या बाबतीत दोघांचे मत एकच होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी शिक्षण आणि बुद्धिमत्तेला जास्त महत्व दिले. तर पुरुषांनी महिलांच्या खुल्या विचारांना जास्त महत्वाचे मानले.

सर्वेमध्ये आढळले की, वय वाढण्यासोबत पुरुष आणि महिला दोघांची प्राथमिकता एकसारखी होऊ लागते. एका वयानंतर दोघे खुलेपणा आणि विश्वासाला जास्त महत्व देतात. सर्वेचे बहुतेक निष्कर्ष जुनेच आहेत परंतु ही काही वाईट गोष्ट नाही.

त्यांनी म्हटले की, या संशोधनाबाबत चांगली गोष्ट ही आहे की हे संशोधन सांगते की, पुरुष आणि महिला एकाच गोष्टीची पर्वा करता. फरक केवळ इतकाच आहे की, त्यांना एकच गोष्ट जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात जाणवते.