Shah Rukh Khan And Kajol | “मी घोड्यासारखी दिसत होते आणि शाहरुख व मी नुसते हसत होतो.” काजोलने सांगितला मज्जेशीर किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची एव्हरग्रीन जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री काजोलकडे (Shah Rukh Khan And Kajol) पाहिले जाते. शाहरुख व काजोल या ऑन स्क्रीन जोडीचे लाखो चाहते आहेत. अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख व काजोल यांनी स्क्रीन शेअर केली असून त्यांची कॅमिस्ट्री लोकांना आजही भावते. करण अर्जुन चित्रपटामध्ये (Karan Arjun Movie) देखील अभिनेता शाहरुख व काजोलने (Shah Rukh Khan And Kajol) एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेले अनेक प्रसंग काजोलने शेअर केला आहे.

अभिनेत्री काजोल ही सध्या तिच्या आगामी ‘द ट्रायल’ (The Trial) या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. काजोल याचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान काजोलने तिच्या करण अर्जुन या चित्रपटाबद्दल तिचा मज्जेशीर किस्सा एका इव्हेंटमध्ये सांगितला आहे. ती म्हणाली, मी शाहरुख सेटवर सारखे हसत रहायचो. चित्रपटातील गाणे जाति हू मै याच्या शुटिंगमध्ये शाहरुखने काजोलची कशी मदत केली होती हे तिने शेअर केले आहे. अभिनेत्री काजोल म्हणाली की, “आम्ही शुटिंगमध्ये नुसते हसत होतो. मला वाटते, शाहरुख ‘कृपया गाणे पूर्ण करा’ असं म्हणण्याचं धाडस देत होता. गाण्यातील डान्सचा पार्ट खूप सोपा होता. पण त्यामध्ये मोठ्याने हसू न येणे हा एक सर्वात अवघड पार्ट होता. पण मला असे वाटते की, गाण्यामध्ये अशा काही जागा आहेत जिथे मी घोड्यासारखी दिसत आहे, यावर शाहरुख म्हणाला, ‘जस्ट शट अप! तू फक्त ते करं आणि पटकन संपवं. प्लीज ते संपव! शाहरुख नेहमी असाच असतो!” असा शुटिंगचा मज्जेशीर किस्सा काजोलने सांगितला.

अभिनेत्री काजोल ही ‘लस्ट स्टोरीज् 2’ (Lust Stories 2) मध्ये देखील झळकली होती. यामध्ये तिला अनेक वर्षांनंतर ऑन स्क्रीन रोमांस (Kajol Romantic Scene) करताना पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले होते. तर काहींनी टीका देखील केली होती. लवकरच ती ‘द ट्रायल’ मध्ये वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शाहरुख खान (SRK) पठान चित्रपटामध्ये (Pathan Movie) झळकला होता. आता तो ‘जवान’ चित्रपटामध्ये (Jawan Movie) जबरदस्त भूमिकेमध्ये दिसणार आहे. काजोल व शाहरुख (Shah Rukh Khan And Kajol) हे नेहमी मस्तीच्या मूडमध्ये असलेले दिसतात. काजोल व शाहरुखची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना देखील खूप आवडते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhvi Kapoor | जान्हवीने तिच्या सहकलाकाराला लगावली कानशिलात; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त