Shah Rukh Khan Hospitalised | अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

अहमदाबाद : Shah Rukh Khan Hospitalised | बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान सध्या आयपीएल २०२४ क्वालिफायर
१ मध्ये त्याची टीम केकेआरला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादमध्ये आहे (KD Hospital Ahemdabad) .
यावेळी त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासणी आणि उपचार केल्यावर डिस्चार्जही देण्यात आला आहे.(Shah Rukh Khan Hospitalised)

काल आयपीएलच्या केकेआर विरुद्ध हैदराबाद सामन्यात शाहरुखच्या मालकीची टीम केकेआरचा विजय झाल्याने तो
मैदानात खेळाडू आणि चाहत्यांना अभिवादन करताना दिसला होता. यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात
दाखल करण्यात आले. अहमदाबादच्या केडी रुग्णालयात त्याची तपासणी आणि उपचार करण्यात आले.

शाहरुख खान आयपीएल २०२४ क्वालिफायर १ मध्ये त्याच्या टीम केकेआरला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादमध्ये आला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो टीमला चिअर अप करताना दिसला होता.

अहमदाबादमध्ये तापमान जास्त असल्याने हवामान खात्याने देखील नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
या उष्म हवामानामुळेच डिहाड्रेशनमुळे शाहरुख खानची प्रकृती बिघडली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंद

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचे फडणवीस आणि पोलिसांवर आरोप; मोहोळांनी दिले प्रत्युत्तर, ”पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखतात”

Porsche Car Accident Pune | आरोपी नातवाची कोर्टात गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे, शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल