Shah Rukh Khan | शाहरुख ‘बेस्ट ॲक्टर’ पुरस्कार मिळवण्यासाठी लाच देण्यास झाला होता तयार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान (Bollywood King Khan) अशी ख्याती असलेला सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा नेहमीच हिट चित्रपट (Hit Movie) देत असतो. त्याच्या 31 वर्षांच्या सिनेविश्वातील कारकिर्दीमध्ये त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अगदी शुन्यापासून या विश्वात आपली हक्काची जागा निर्माण करणाऱ्या शाहरुखचा (Shah Rukh Khan) तगडा चाहता वर्ग देखील आहे. त्याचे हे यश आता जरी फळाला आलेले असले तरी यामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत आहे. मात्र एक काळ असा देखील होत की शाहरुख बेस्ट ॲक्टर हा पुरस्कार मिळवण्यासाठी एवढा अधीर झाला होता की त्यासाठी तो अगदी काहीही करण्यासाठी तयार होता. अगदी तो पुरस्कारासाठी लाच देण्यासाठी तयार झाला होता.

अभिनेता शाहरुख खानला त्यांच्या अभिनयासाठी आतापर्यंत अनेक पुरस्करांनी सन्मानित (Shah Rukh Khan Winning Award) करण्यात आले आहे. त्यामध्ये अगदी 14 फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) ते फ्रान्स सर्वोच्च नागरी पुरस्कार यांचा समावेश आहे. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये इतर निवोदित कलाकारांप्रमाणे शाहरुखलाही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (Best Actor Award) मिळवण्याची खूप इच्छा होती. ते मिळवण्यासाठी त्याने केलेल्या एका चुकीच्या प्रयत्नाविषयी त्याने मुलाखतीमध्ये सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखने कबुल केले त्याने पुरस्कारासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

अभिनेता शाहरुख खानचे अनेक चित्रपट गाजत होते तरीही त्याला ‘बेस्ट ॲक्टर’ हा पुरस्कार मिळत नव्हता. अभिनेता शाहरुख खानने (SRK) सांगितले की, पुरस्कार मिळविण्यासाठी मी उत्सुक होतो कारण मला वाटले की मी त्यासाठी पात्र आहे. त्यामुळे या इच्छेसाठी मी वाईट झालो. मी संपादकांकडे गेलो आणि म्हणालो की मला हा पुरस्कार हवा आहे आणि तुम्हाला पैसे हवे असतील तर मी तेही द्यायला तयार आहे. पण ते मला म्हणाले की येथे असे काही चालत नाही, तुम्ही चांगले असाल तर लोक तुम्हाला मत देतील.” आणि आश्चर्य म्हणजे त्या वर्षीचा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार देखील जाहीर झाला. मिळालेला पुरस्कार हा कोणत्याही पैशाने नाही तर लोकांच्या मतांमुळे मिळाला होता. अवॉर्ड जिंकल्यानंतर शाहरुखने एडिटरची स्टेजवर माफी मागितली होती.

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) या वर्षाच्या सुरुवातीला ‘पठान’ चित्रपटातून (Pathan Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. शाहरुख व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट (Jawan Movie Release Date) येत्या 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यामध्ये शाहरुख खानने डबल रोल केला आहे. तसेच त्याच्या ‘डंकी’ (Dunki) हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित (Director Rajkumar Hirani) चित्रपटात शाहरुख झळकणार आहे. या वर्षीच्या नाताळ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title : Shah Rukh Khan | when shah rukh khan ready to give money to get best actor award said i was very desperate to get a best actor award

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page andTwitter for every update

हे देखील वाचा

Kangana Ranaut | कंगनासाठी ‘हा’ अभिनेता झाला होता बायकोलाही सोडण्यास तयार

Anushka Sharma | अनुष्का शर्माने सांगितले रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये न येण्याचे कारण

Congress Leader On NCP Crisis | ‘मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित…’ राष्ट्रवादीमधील बंडखोरीवरुन काँग्रेस नेत्याचे मोठं विधान

Pune MCOCA Case | कर्वेनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणार्‍या पप्पुल्या वाघमारेसह 9 जणांवर ‘मोक्का’, CP रितेश कुमार यांची 33 वी कारवाई

Maharashtra Politics News | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप?, राष्ट्रवादीनंतर ‘हा’ गट सत्तेत येणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्याध्यापकाला चोप