Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सूरतमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडासोबत आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) देखील गेले होते. तिथून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला तिकडची मजा कथन करताना, काय झाडी, डोंगार, काय हाटेल.. ओकेमध्ये सगळं असे म्हंटले होते. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. त्यानंतर ते राजकारणात देखील सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी आपल्या एका विधानावरुन तोंड फिरवले आहे. शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी आपल्या विधान सहजतेने घ्या, म्हंटले आहे.

मला विधान परिषदेवर पाठवा आणि अभिजीत पाटील (Abhijit Patil) याला आमदार करा, असे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले होते. गुरसाळे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पाटील बोलत होते. विधान परिषदेची मागणी केल्यामुळे पाटलांनी विधानसभेच्या राजकारणातून काढता पाय घेतला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर पाटलांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

तो विषय सहज घेण्याचा आहे. त्याला गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही.
अभिजीत पाटील हा नात्याने माझा भाचा आहे. एवढ्या तरुण वयात तो चार ते पाच साखर कारखाने चालवतो.
त्यामुळे एवढा कर्तुत्वान तरुण मी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिला नाही. त्याला उत्साह येण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी मी हे व्यक्तीगत विधान केले होते. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असे पाटील म्हणाले.

सांगोला विधानसभा मतदार संघातून (Sangola Assembly Constituency)
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला विधानपरिषदेवर
पाठवा, अशी मागणी पाटील यांनी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे केली.
अभिजीतला सांगोल्यातून विधानपरिषदेचे तिकीट द्या अशी जाहीर मागणीच पाटलांनी केल्याने चर्चांना उधाण आले होते.
अखेर त्यांना सारवासारव करत घुमजाव केले आहे.

Web Title :- Shahaji Bapu Patil | dont take that statement of mine seriously mla shahaji bapu patils retort within a few days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा