शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत देणार दुसऱ्या बाळाला जन्म

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने आणि सुंदर दिसण्याने शाहिद कपूर खूप प्रसिद्ध आहे.त्यातच आपल्या चाहत्यांना शाहिद कपूरची आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच गोड बातमी देणार आहेत. मीरा कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे साहजिकच शाहिद कपूर सध्या जाम आनंदात आहे. इतक्या मोट्या आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी काल शाहिदने मीरासाठी खास बेबी शॉवर पार्टी ठेवली होती. यावेळी मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यावेळी मीराच्या चेह-यावरचे तेज सगळ्यांनीच पाहिले.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a51478d4-88cf-11e8-b4e5-3d9757f7633a’]

काल दुपारी साजऱ्या झालेल्या या पार्टीची सगळी व्यवस्था शाहिदने स्वत: केली होती. यावेळी शाहिद व मीरा दोघेही केक कापतांना दिसले. यानंतर शाहिदने स्वत:च्या हातांनी मीराला केक भरवला. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे लग्न तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती़ म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. आता मीरा पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.

मीशाच्या जन्मानंतर मीरा व शाहिद दोघेही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये दिसले होते़ या शोमध्ये मीराच्या हजरजबाबी स्वभावाने सगळ्यांचीच मने जिंकली होती़ यानंतर मीरा बॉलिवूड डेब्यू करणार, अशाही बातम्या आल्या होत्या़ पण तूर्तास मी चित्रपटात काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही. अशा बातम्या कुठून येतात, हे मला कळत नाही,असे तिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल होते. करिअरबद्दल विचारले असता, मला लवकरात लवकर स्वत:ला कामात झोकून द्यायचे आहे. कामासोबतच मला कुटुंबासाठीही वेळ द्यायचा आहे. आमच्या दुस-या मुलाबद्दलही आम्ही विचार करत आहोत, असे ती म्हणाली होती.