Shahnaz Gill | धडक चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर शहनाज गिलचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – ‘बिगबॉस सीझन-१३’ (‘Bigg Boss Season-13’) फेम शहनाज गिल (Shahnaz Gill) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दरम्यान ती लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार (Shahnaz step into Bollywood)आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये आल्यानंतर शहनाज गिल लोकप्रिय झाली आणि प्रत्येकाच्या आवडत्या यादीत तिचा समावेश झाला. आज ती केवळ पंजाबची कतरिनाच (Katrina in Punjab) नाही तर संपूर्ण देशाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शहनाज गिलची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होतात. नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

शहनाज गिलचा डान्स व्हिडिओ

दरम्यान नकताच शहनाज गिलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही लोकांसह ‘धडक’ चित्रपटातील (Dhadak movie) ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स (Shahnaz Gill’Zingat’Song Dance) करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ‘झिंगाट’ची सिग्नेचर स्टेप खूप छान करत आहे. तिच्या प्रत्येक हालचालीने चाहते वेडे झाले आहेत.तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. शहनाजचा हा डान्स लोकांना खूप आवडतो.तिच्या या लूकबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल पांढऱ्या रंगाच्या मिडीमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. तिने पांढरा ड्रेस घातला आहे.केसांच्या बटा काढत तिने केसात पोनी घातली आहे.या लुकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

 

शहनाज गिलचा नवीन चॅट शो
शहनाज गिल आता लोकप्रिय स्टार बनली आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ (‘Kisi ka bhai kisi ki jaan’ Movie) या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवणार आहे.
तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ (‘Desi Vibes with Shahnaz Gill’) नावाचा चॅट शोही (chat show) सुरू झाला आहे.
यापूर्वी राजकुमार राव तिच्या चॅट शोचे पहिले पाहुणे म्हणून आले होते.
या क्षणी शहनाज गिल आता तिच्या करिअरच्या उंचीकडे वाटचाल करत आहे आणि तिचे चाहते तिच्यासाठी खूप खुश आहेत.

 

Web Title :- Shahnaz Gill | bigg boss fame shehnaaz gill danced on zingaat songh video got viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा

Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले

Sanjay Raut On CM Eknath Shinde | “…ढोंगी लोक बाळासाहेबांचे वारसदार होऊ पाहत आहेत”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका