‘किंग’ खानसोबत पुन्हा एकदा दिसणार काजोल ? उत्तर ऐकून चकित व्हाल !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या वापसीसाठी चाहते आतुर झाले आहेत. बहुतेक चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण नवीन रिपोर्टनुसार, शाहरुख खान आगामी सिनेमा राजकुमार हिरानी किंवा राज अँड कृष्णा डी के सोबत करू शकतो. आगामी सिनेमाची घोषणा करण्यासाठी त्यानं थोडा वेळ मागितला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, शाहरुख खान सोबत लिड अ‍ॅक्ट्रेस म्हणून काजोलला अप्रोच करण्यात आलं होतं. परंतु अशी काही ऑफर मिळाल्याचं काजोलं नाकारलं आहे. या सगळ्या अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. याआधी काजोल आणि शाहरुख दिलवाले सिनेमात दिसले होते. शाहरुख आणि काजोल अनके हिट सिनेमात एकत्र काम करताना दिसले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम असे काही त्यांचे हिट सिनेमे सांगता येतील.

https://www.instagram.com/p/B8-0Mm_hWsK/

शाहरुख खानचा राजकुमार हिरानीसोबतचा आगामी सिने मा इमिग्रेशन ड्रामावरी आधारीत असणार आहे. शाहरुख यआआधी अशा भूमिकेत दिसलेला नाही. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, शाहरुख खाननं स्टायलिश अ‍ॅक्शन राज अँड कृष्णा डीके सोबत साईन केला आहे.

https://www.instagram.com/p/B8-ecLYB95X/