ShahRukh Khan | शाहरुख खानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज; अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करणार काम

पोलीसनामा ऑनलाइन – ShahRukh Khan | नुकताच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा हा ड्रग्स प्रकरणात अडकल्याने चर्चेत होता. त्यामध्ये तो स्टारकिड् असल्यानेदेखील त्याच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आहे. कारणदेखील तेवढेच रोमांचक आहे. सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. (ShahRukh Khan)

स्वतः आर्यन खानने याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. आर्यन मात्र अभिनय क्षेत्रात नाही तर लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार आहे. लोकप्रिय इस्राईली वेबसीरिज ‘फौदा’चा अभिनेता आणि निर्माता यांनी त्याला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन हा शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमधूनच कामाची सुरुवात करणार आहे. आर्यनने पोस्ट शेअर करत म्हटले की, “लिखाणाचे काम पूर्ण झाले….. आता ॲक्शन म्हणण्यासाठी सज्ज आहे”. त्याच्या या पोस्टवर आई गौरी खान हिनेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत, तर याआधी शाहरुखने एका मुलाखतीत आर्यनला अभिनय क्षेत्रात नाही तर दिग्दर्शन आणि लिखाणात रस असल्याचे सांगितले होते. (ShahRukh Khan)

आर्यन खानने परदेशातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे, तर आता लवकरच त्याची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर शाहरुख खानची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेब सीरिजमधून पदार्पण करणार आहे. तिची आगामी सीरिज नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Web Title :- ShahRukh Khan | shahrukh khan son ready for his debut as writer aryan khan shares through instagram post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | मुख्यमंत्री शिंदे यांनी उरुळी देवाची-फुरसुंगीचे केले राजकीय ‘ऑपरेशन’ ! सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना आयुष्यभर सोसाव्या लागणार वेदना?

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया