शाहरुख बनणार खलनायक

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

शाहरूख खानची व्हिलन म्हणून ‘धूम’ चित्रपटाच्या चौथ्या भागासाठी निवड केल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी सलमानची निवड केली असल्याचे म्हटले जात होते. पण आता या भूमिकेसाठी शाहरूखची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे.
[amazon_link asins=’B071NNLMDF,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89c469c7-a480-11e8-a714-bb19a584ae6d’]
व्हिलन म्हणून शाहरूखचा हा पहिला चित्रपट नाही. करिअरच्या सुरूवातीला ‘डर’ आणि ‘बाजीगर’ या चित्रपटात शाहरूखने नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. शाहरूखला सुपरस्टारचा दर्जा मिळवून देण्यात या दोन्ही चित्रपटांचा मोठा वाटा आहे.