Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाईन : Shailesh Lodha | सध्या अभिनेता विकी कौशल त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडत आहे. ‘मसान’, ‘उरी’, ‘राझी’ यासारख्या चित्रपटातून विकी कौशलने अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर आता विकीच्या नव्या चित्रपटांमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढा यांनी विकीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. (Shailesh Lodha)

शैलेश लोढा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून विकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, “विकी एक उत्तम व लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचबरोबर विकी उत्कृष्ट व्यक्ती देखील आहे. विकीचा नम्रपणा ज्येष्ठ व्यक्तिप्रती असलेला त्याचा आदर आणि त्याचा सरळ स्वभाव यामुळे तो सर्वांच्याच मनात घर करतो. एवढेच नाही तर विकीला माझ्याबद्दल वाटणारा आदर व माझ्यावर असलेल्या प्रेमाला सीमाच नाही”. (Shailesh Lodha)

ते पुढे म्हणाले, “आज खूप दिवसांनी विकी कौशलची अचानक भेट झाली आणि भेटल्यानंतर तो लगेच मला म्हणाला
योगायोग आहे दोन दिवसांपूर्वीच तुमच्याबद्दल बोलत होतो शैलेश भाई…… विकी तू मला भावा सारखा आहेस तू
आयुष्यभर असाच रहा तुझ्यासारखे फार कमी व्यक्ती असतात”.
शैलेश लोढा यांनी विकीसाठी लिहिलेली हि पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
तर या पोस्टवर भरपूर लाईक व कंमेंट्स येत आहेत.

Web Title :- Shailesh Lodha | tarak mehta ka oolta chashmah fame actor shailesh lodha wrote special post for vicky kaushal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार

Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन