Shalini Thackeray On Sushma Andhare | राज ठाकरेंच्या नातवावरुन रंगले राजकारण; शालिनी ठाकरेंचा अंधारेंना इशारा, म्हणाल्या – ‘अन्यथा कानाखाली वाजवू डीजे…’

पोलीसनामा ऑनलाइन – Shalini Thackeray On Sushma Andhare | राजकारणामध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन्ही गट एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. दरम्यान, मनसे देखील मराठी माणूस आणि त्यांची अस्मिता याविषयी आक्रमक झालेली दिसून येत आहे. समाजामध्ये सध्या चालू असलेल्या अनेक घटनांवर मनसे पक्षाकडून आणि पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. पण सध्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे विरुद्ध शिवसेना (उबाठा) अशी लढत सुरु झाली आहे. या लढाईमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांचा नातू कियान ठाकरे याचा देखील उल्लेख केला. यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. आपण नैराश्यामध्ये आहात असे देखील शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. (Shalini Thackeray On Sushma Andhare)

https://x.com/RajThackeray/status/1708428528386232480?s=20

गणेशोत्सव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करत गणेशोत्सव उत्साहामध्ये पार पडला पण मिरवणूकीमध्ये डीजे आणि डॉल्बी यांचा वाढत्या आवाजावरुन नाराजी व्यक्त केली होती. ट्वीट करत त्यांनी कर्कश्श आवाजाची पातळी, शहराला विद्रुप करणारे होर्डिंग्स याबाबत मोठी पोस्ट लिहित खंत व्यक्त केली होती. राज ठाकरेंच्या या पोस्टवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या या नाराजीवर अंधारे यांनी आक्षेप घेत पत्रकार परिषदेमध्ये खोचक टोला लगावला. “एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसं चालेल? यावर बोललं पाहिजे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अंधारेंनी राज ठाकरेंच्या नातवाला खेचल्यामुळे शालिनी ठाकरे यांनी पत्र लिहित आणि ट्वीट करत सुषमा अंधारेंना सुनावले आहे. (Shalini Thackeray On Sushma Andhare)

https://x.com/ThakareShalini/status/1710120374846017703?s=20

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “अंधारेबाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांमध्ये शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना इशारा दिला. ट्वीट सोबतच शालिनी ठाकरे यांनी पत्र देखील लिहिले आहे. या पत्रामध्ये अंधारेंना नैराश्य आले असून तुम्हाला देखील मुलगी आहे. तिच्यावर कोणी अशी विधाने केली तर तुम्हाला चालतील का ? असा सवाल देखील शालिनी ठाकरेंनी विचारला आहे.

शालिनी ठाकरे यांनी पत्रामध्ये सुषमा अंधारेंचा खरपूस समाचार घेतला आहे. पत्रामध्ये शालिनी ठाकरे यांनी लिहिले आहे,
“काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला
विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं.
पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात.
कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या ‘गट’प्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे
कसे राहतील?” शिल्लकसेना आपल्याकडे आज काल दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण नैराश्यामध्ये आहात.
आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली तर ती तुमच्या
मनाला रुचतील का ? अशा शब्दांमध्ये शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार
हल्लाबोल केला आहे. याआधी देखील उद्धव ठाकरे यांनी टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
नातवाला राजकारणामध्ये ओढत टीका केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिका: शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा एक लाख 60 हजारांपर्यंत वाढवली, पण तांत्रिक कारणास्तव महिन्याभरापासून अंमलबजावणीच नाही

Pune Crime News | एटीएम कार्ड चोरून पैसे काढून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी विश्रांतवाडी पोलिसांकडून गजाआड