
Shani Dev Shap Katha | ‘या’ कारणामुळे शनिदेवाला त्यांच्या पत्नीने दिला होता भयंकर शाप, जाणून घ्या पौराणिक कथा
नवी दिल्ली : Shani Dev Shap Katha | शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. या दिवशी शनिदेवाची पूजा-उपासना केली जाते. शनिदेवाला (Shani Dev) न्यायाची देवता म्हटले जाते. ते चांगली कर्म करणार्यांना शुभ फळ देतात, आणि वाईट कर्म करणार्यांना शिक्षा करतात. असे म्हटले जाते की, शनिवारी खर्या श्रद्धेने आणि भक्तीने शनिदेवाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. (Shani Dev Shap Katha)
शनिदेव भगवान श्रीकृष्णाचे (Bhagvan Shri Krishna)अनन्य भक्त आहेत. यासाठी असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाची पूजा केल्याने शनिच्या समस्त बाधा दूर होतात. मात्र, शनिदेवांना सुद्धा एकदा शाप मिळाला होता. या शापामुळे शनिदेव डोके झुकवून चालतात. हा शाप स्वता शनिदेवांच्या पत्नीने दिला होता. या शापाची कथा जाणून घेवूयात.
काय आहे कथा
कथा अशी आहे की, शनिदेव कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होते. तेव्हा शनिदेवांची अर्धांगिनी चित्ररथ ऋतुस्नान करून कामेच्छेच्या हेतूने आली. मात्र, शनिदेव भक्तीमध्ये तल्लीन होते, तेव्हा त्यांनी अर्धांगिनी चित्ररथकडे लक्ष दिले नाही.
चित्ररथ (Mata Chitrarath) मातेला हा त्यांचा अपमान वाटला आणि त्यांनी ताबडतोब शनिदेवाला शाप दिला की, ज्या व्यक्तची नजर त्यांच्यावर पडेल, तो यथाशीघ्र जळून नष्ट होईल. हे ऐकून शनिदेवांचे भक्तीतून लक्ष उडाले.
त्याचक्षणी शनिदेव चित्ररथ मातेच्या भावनांचा सन्मान करत म्हणाले, हे देवी! तुम्ही रागावणे योग्यच आहे. मी माझ्या चुकीसाठी क्षमा मागतो.
त्याचवेळी चित्ररथ मातेला सुद्धा तिच्या चुकीची जाणीव झाली. यानंतर, चित्ररथ मातेने शनिदेवांना माफ केले. (Shani Dev Shap Katha)
मात्र, शाप निष्फळ होऊ शकला नाही. कालांतराने शनिदेव डोके खाली घालून चालू लागले.
शास्त्रात सांगितले आहे की, शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या नजरेला नजर देऊ नये.
तर, शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी रोज त्यांची पूजा, जप, तप आणि ध्यान करावे. शनिवारी पिंपळाच्या झाडावर जल अर्ध्य द्यावे.
Web Title : Shani Dev Shap Katha | shani dev was given a terrible curse by his wife know the epic story
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update