Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

पुणे : Sharad Pawar | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही बाजूंचे कान टोचले. पवार यांनी म्हटले की, आज टीव्ही लावला की एकच ऐकायला मिळते.. काय झाडं, काय हवा… हे एखाद्या वेळी ठीक आहे. पण रोजच या गोष्टी पाहायला मिळतात. राज्याच्या प्रमुख लोकांनी राज्याचा विचार मांडायला हवा. त्याऐवजी सातत्याने एकमेकांशी वाद काढले जात आहेत. (Sharad Pawar)

पवार म्हणाले, वेदांता प्रकल्प प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असे व्हायला नको होते. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.

पवार म्हणाले, दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या संबंधी दूषणे द्यायची, वाद करायचे या गोष्टी बंद करायला हव्यात
आणि महाराष्ट्रातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीने पुढे कसे जाऊ, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
टीका करा, पण रोजच करू नका. एक दिवस-दोन दिवस ठीक आहे. किती दिवस? नवीन प्रकल्प कसे येतील,
यावर लक्ष केंद्रीत करा.

Web Title :- Sharad Pawar | NCP Chief sharad pawar slams cm eknath shinde uddhav thackeray on vedanta foxconn project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!

Anil Bonde On Love Jihad | लव्ह जिहाद’वरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘मी संसदेत लवकरच…’

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली