Anil Bonde On Love Jihad | लव्ह जिहाद’वरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘मी संसदेत लवकरच…’

मुंबई : Anil Bonde On Love Jihad | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढली आहेत. येत्या अधिवेशनात विधेयक आणणार आहोत. आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, अशी माहिती भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी दिल्लीत दिली. ते महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Anil Bonde On Love Jihad)

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणांबाबत माहिती देताना बोंडे म्हणाले, लव्ह जिहाद हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडानंतर ज्या आरोपीला पडकले, त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता.

खासदार बोंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मेळघाटातल्या आदिवासी मुलींना फसवून आणले जाते. जर मुलांना विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना चिखलदरा तालुक्यातही घडली.
ही मुले महाविद्यालयासमोर उभे राहुन मुलींवर लक्ष ठेवतात.
तसेच फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो, असा गंभीर आरोप बोंडे यांनी केला.

बोंडे पुढे म्हणाले, मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.
तसेच येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे.
आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांच्या पालकांना एक महिना आधी सुचना दिली जावी, अशी मागणीही बोंडे यांनी केली.

Web Title :- Anil Bonde On Love Jihad | BJP leader anil bonde said we bring draft for love jihad in next parliamentry session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Pune PMC News | केबल डक्टच्या कामात महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान; ‘राजकिय आशिर्वादाने’ ठेकेदार ‘जोमात’ मनपा ‘कोमात’

Ajit Pawar On Eknath Shinde Group | अजित पवारांची शिंदे गटावर पुन्हा खोचक टोलेबाजी, म्हणाले – ‘रात्री बावचळून उठतात, खोकं, खोकं…’

Vitamin-C | केवळ लिंबू आणि संत्र्यातच नव्हे, ‘या’ 5 फूड्समध्ये सुद्धा असते व्हिटॅमिन-सी चे भरपूर प्रमाण