Sharad Pawar On BJP In Pune | ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर खोटे आरोप करणार्‍या भाजपने जलसंपदा, बँक गेैरव्यवहारांची चौकशी करून अहवाल जनतेपुढे ठेवावा – शरद पवार

देशाला अराजकतेकडे नेणार्‍या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र या; महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On BJP In Pune | ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करायचे एवढा एकमेव कार्यक्रम भाजप देशात राबवत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीवर देखिल बँकेत गैरव्यवहाराचे, जलसंपदा विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अख्त्यारीत समिती स्थापन करून अहवाल जनतेपुढे ठेवा असे आव्हान इंडिया आघाडी फ्रंटचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज येथे दिले. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणार्‍या आणि देशाला योग्य दिशेवर नेणार्‍या नेत्यांबद्दल घृणास्पद वक्तव्य करून देशाला अराजकतेकडे नेणार्‍या भाजपला खाली खेचून परिवर्तन करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनही पवार यांनी केले.

महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्यावतीने शनिवारी कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहीर, खासदार सुप्रिया सुळे, ऍड. वंदना चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, सोनल पटेल, आपचे मुकुंद किर्दत, अजित अभ्यंकर, अरविंद शिंदे, संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत जगताप, संजोग वाघेरे, रमेश बागवे, मोहन जोशी यांच्यासह इंडिया फ्रंटमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी आणि अन्य पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मागील साठसत्तर वर्षात समविचारी आणि अटलबिहारी वाजपेंयीसारखे नेतृत्व पाहीले. परंतू कधी संविधानाची चिंता वाटली नाही. परंतू नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांची भूमिका घृणा निर्माण करण्याचीच राहीली आहे. जे नेहरू स्वातंत्र्यलढयात जेलमध्ये राहीले. स्वातंत्र्यानंतर लोकशाही मजबूत करण्यासोबत देश उद्योग, शिक्षण आणि विज्ञानात पुढे जावा यासाठी देशाला योग्य दिशेवर नेले. हे संपुर्ण जग मान्य करते परंतू मोदींना मान्य नाही. हातात माईक आला की फक्त नेहरू विरोध सुरू करतात.

याच नेहरूंच्या काळात देशाने अन्नधान्य निर्मीतीसाठी मुर्हुतमेढ रोवली. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकर्‍यांमुळे देश अन्नधान्यात स्वंयपुर्ण तर बनलाच उलट निर्यात करू लागला. त्याच शेतकर्‍यांना दरवर्षी उन्हा, पावसात आंदोलन करावी लागत आहेत. परंतू नरेंद्र मोदी त्यांच्याकडे साधे ढुंकूनही बघत नाहीत. अशा सत्ताधार्‍यांना शेतीतील तणाप्रमाणे उखडून फेकायचे आहे.

पुर्वीची सरकारे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय राखून विकास करायची. परंतू मोदी यांच्या काळात विरोधी सत्तेतील राज्यांची कोंडी करायची. त्यांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून बदनाम करायचे एवढाच एककल्ली कार्यक्रम असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्री, ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री, आपल्याकडील अनिल देशमुख, संजय राउत या सारख्या नेत्यांवरही असेच खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये पाठविले. परंतू भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत. केवळ विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत असून मूळ प्रश्‍नांपासून दूर जाणार्‍या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

फडणवीस यांनी धनगर, मराठा, ओबीसींची फसवणूक केली – नाना पटोले

कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी शेतीला हमीभाव, बेरोजगारी, सामाजिक वादावरून केंद्र सरकारवर हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले मात्र या समाजाची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणे लावल्याचा आरोप केला. केंद्रात आमची सत्ता आल्यास देशव्यापी जातगणना करून सर्व समाजांना न्याय देउ, असे आश्‍वासनही पटोले यांनी यावेळी दिले. पुण्यासारखे सुसंस्कृत शहर अंमली पदार्थाचे हब बनले आहे. तडीपार लोक मंत्र्यांसोबत फिरत आहेत. पोलिस निवडणुकीत पैसे वाटतात. देश भ्रष्टाचाराच्या दलदलित रुतवण्यासाठी भ्रष्टाचार्‍यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. ही हुकुमशाहीची लक्षणे असून त्यांना सत्येत खाली खेचण्यासाठी सर्व ताकद पणाला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

यामुळे शिवसेना फोडली – सचिन अहीर

‘मुंह मे राम आणि हाताला काम’ हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. सर्व समाजांना सोबत घेउन जाणारी शिवसेना पुढे जाईल,
या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली असा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहीर यांनी यावेळी केला.
भाजपने हेच षडयंत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधातही रचले. महाविकास आघाडी व मित्र पक्ष एकत्र आल्यास भाजपला
हरवू शकतो, हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीने अधोेरेखित केले आहे.
आगामी निवडणुकीत याची पुनरावृत्ती करू, असा विश्‍वास अहीर यांनी व्यक्त केला.

तर स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार नाहीत – सुप्रिया सुळे

भाजपने आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला आणि राज्यसभेवर देखिल घेतले.
भाजपने जाहीर करावे अशोक चव्हाण निर्दोष आहेत, असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
नोकरभरतीच्या परीक्षांची पेपरफुटी आण जिलजीवन मिशनच्या कामांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याचा व्हाईट पेपर जाहीर करावा, असे आव्हान देतानाच सुळे यांनी ज्या पद्धतीने
केंद्राचा हुकुमशाहीचा कारभार सुरू आहे ते पाहाता केंद्रात भाजप सत्तेत आल्यास महापालिका, जिल्हा परिषदेसह
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत, अशी भितीही यावेळी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cop Suspended | पुणे : पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Sharad Pawar | ”राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती”, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता