Sharad Pawar | ”राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती”, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar | turha symbol unveiled at raigad sharad pawars first reaction said to blow the trumpet

रायगड : Sharad Pawar | देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. मात्र, सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रातील स्थिती बदलण्यासाठी, जनतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन पक्षचिन्हाचे अनावरण आज किल्ले रायगडावर करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते उपस्थितीत होते. राष्ट्रवादीने यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे.
संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना रायगड किल्ला सर करणे अशक्य असल्याने ते रोप-वे ने गेले.
तेथून गडावरील प्रवास त्यांनी पालखीने केला. शरद पवार यांच्या आजच्या कार्यक्रमाची दखल जवळपास सर्वच
विरोधकांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे इत्यादी नेत्यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती