Pune Cop Suspended | पुणे : पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cop Suspended | बालविवाह केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस शिपाई गणेश शिवाजी चेमटे (Police Officer Ganesh Shivaji Chemte) असे निलंबित (PUne Police Suspended) करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 संदीप सिंह गिल्ल यांनी शुक्रवारी (दि.23) काढले आहेत.

पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी चेमटे यांचा दोन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहुन तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गणेश चिमटे यांच्यासह इतरांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत व पोक्सो कायद्यानुसार गुरुवारी (दि.22) गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याने गणेश चेमटे यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन काळात गणेश चेमटे यांना कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच निलंबनाच्या कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय पुणे शहर यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार