Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue | ‘बेळगाव, कारवार आणि निप्पाणी देणार असाल, तर ‘जत’च्या ठरावावर चर्चा करु’ – शरद पवार

मुंबई : Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न फार जुना आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यापासून मराठी भाषिक प्रांतांची महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वाटणी करण्यात आली. त्यावेळी बेळगाव, कारवार आणि निप्पाणीसह अनेक मराठी भाषिक प्रदेश त्यावेळच्या राजकारण्यांनी कर्नाटकाला दिले. त्याविरोधात महाराष्ट्र शासनाने 2004 सालापासून सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु केली आहे. आता पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्याने सीमाप्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत कर्नाटकाला एक प्रस्ताव दिला आहे. आम्हाला बेळगाव, कारवार आणि निप्पाणी परत देणार असाल, तर जत तालुक्यातील गावांवर चर्चा करु, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. (Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue)

सीमाप्रश्नावर भाजपला भूमिका टाळता येणार नाही. भाजपने यावर तात्काळ निर्णय घ्यावा. बेळगाव, कारवार, निप्पाणी, भालकी, बिदर महाराष्ट्रात समावून घेण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे. मी काल बोम्मईं यांचे जतबाबत विधान ऐकले. जर ते लोक बेळगाव, कारवार, निप्पाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील, तर त्यांना काय देता येईल, यावर चर्चा करणे शक्य होईल, असे शरद पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आम्ही राज्यातील एक गाव सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

तसेच अजित पवार यांनी देखील या मुद्दयावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांचा आम्ही निषेध करतो.
ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना त्यांनी सांगलीतील जत तालुक्यासंबंधी विधान केले. आणि आता सोलापूरातील अक्कलकोट विषयी विधाने करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. यापूर्वी अशी मागणी होताना दिसत नव्हती. आता फक्त मुंबईची मागणी करण्याची बाकी राहिले आहे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात सहन करणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा.

Web Title :- Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue | ncp chief sharad pawar comment on maharashtra karnataka border dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

BJP Vs Congress In Maharashtra | भाजपच्या दोन दिग्गजांमध्ये बेबनाव…, काँग्रेस नेत्याचं विधान