Sharad Pawar On Modi Govt | दहा वर्षांचा त्यांचा कारभार पाहून लोक अस्वस्थ, परिवर्तनाच्या मनस्थितीत, शरद पवारांचे वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Modi Govt | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारने (BJP Govt) दहा वर्षात केलेल्या कारभाराने लोक अस्वस्थ आहेत, परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत, असे वक्तव्य करत शरद पवार यांनी भाजपाची निष्क्रियता आणि घातक धोरण उपस्थितांसमोर मांडले.(Sharad Pawar On Modi Govt)

ते उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar), जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देविदास भन्साळी इत्यादी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात लोकांची मन:स्थिती परिवर्तन करण्याची आहे. १० वर्षांत देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.

शरद पवार, या सरकारचे शेतीवरचे लक्ष कमी होत आहे. या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरू आहे.
मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे आणि म्हणूनच
४०० पारचा नारा ते देत आहेत.

तर उमेदवार अमोल कोल्हे यांनी या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार थेट सुनावले.
अमोल कोल्हे म्हणाले, तुमच्या सांगण्यावरून भूमिका बदलली नाही, स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून तुम्ही
निधी अडविला. मात्र, शिरूरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर टीका करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,
देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेले आहेत.
कारण भाजपला एक काम सांगता येत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया