Sharad Pawar On PM Narendra Modi | महागाईवरून शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका, ”पेट्रोलचे दर 50 टक्के कमी करतो म्हणाले, पण…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On PM Narendra Modi | २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ५० दिवसांच्या आत पट्रोलचा भाव ५० टक्के कमी करण्याचे जाहीर केले होते. आज त्यांची घोषणा होऊन ३ हजार ६५० दिवस झाले, पण भाव कमी होण्याऐवजी वाढले, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ते दौंड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.(Sharad Pawar On PM Narendra Modi)

पट्रोल-डिझेलच्या दरावरून पंतप्रधान मोदींवर शरसंधान करताना शरद पवार म्हणाले, २०१४ ला ७१ रुपये लिटर पेट्रोलचा भाव होता. ५० टक्के कमी करतो म्हटले, म्हणजे ३५ रुपये किमान व्हायला हवा होता. पण आता तो भाव १०० ते १०६ रुपये आहे. याचा अर्थ एकच आहे, शब्द दिला एक आणि केलं दुसरं.

महागाईवर बोलताना शरद पवार म्हणाले, २०१४ ला घरगुती गॅसच्या एका सिलेंडरचा दर ४१० रुपये होता,
आज १ हजार १६० आहे. तसेच देशातल्या २ कोटी तरुण मुलांना रोजगार देण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.
देशामधले १०० पैकी ८४ मुले बेकार आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारचे अपयश उघड केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज