Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले ”त्यांचं म्हणणं खरं, आत्मा अस्वस्थ, पण तो…”

जुन्नर : Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचे म्हणणे खरे आहे. आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे दुखणं बघून अस्वस्थ आहे. देशात महागाई वाढलीय, लोकांना संसार करणे कठीण झालंय, त्यासाठी शंभर वेळा अस्वस्थता दाखवेन. लोकांचे दुख: मांडणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते जुन्नरमधील एका सभेत बोलत होते.(Sharad Pawar On PM Narendra Modi)

काल पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांना भटकता आत्मा म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद विरोधी पक्षात उमटत आहेत. आज स्वत: शरद पवार यांनी मोदींच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, आज चांगले काम करणाऱ्यांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातोय. सत्ताधारी लोक सत्तेचा गैरवापर करत असून राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र, सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत.

शरद पवार म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे.
मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तम काम केले.
मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकले.
महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे, असा घणाघात पवारांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार