Sharad Ponkshe | लंडनच्या मिलिट्री स्कूलमध्ये महाराष्ट्राच्या 5 योद्ध्यांचं शिक्षण दिले जाते; शरद पोंक्षेचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात.

शरद पोंक्षे हे व्याखाने देखील देतात. सावरकर हा त्यांच्या अनेक व्याख्यानांचा मुख्य विषय असतो. त्यामुळे शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी विचारसरणीचे आहेत हे सर्वानाच माहित आहे. शिवाय ते त्यांच्या प्रत्येक भाषणातून हिंदू धर्म, तसेच सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्याच एका भाषणातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लंडनच्या मिलिट्री स्कूलमध्ये महाराष्ट्रातील 5 योद्ध्यांबद्दल शिक्षण दिलं जातं आणि हे योद्धे कोण आहेत त्याबद्दल त्यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे. .

ते म्हणतात, “लंडनच्या मिलिट्री स्कूलमध्ये भूतलावर लढणाऱ्या योद्ध्यांचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यातील पहिली 5 नावं ही महाराष्ट्रातील योद्ध्यांची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा, तात्या टोपे, संताजी आणि धनाजी ही ती 5 नावं. आज यांची युद्धनीती तिथे शिकवली जात आहे आणि या महाराष्ट्रातील योद्धांकडून जगावर राज्य कस करावं हे तिकडे शिकवलं जात .. आणि जिथे ही लोक जन्माला आली तिथे काय चाललंय? संताजी धनाजी आम्हाला माहीत नाहीत, तात्या टोपे आम्हाला माहीत नाहीत, त्यांच्यावरही जातीवादाचा ठप्पा लागलाच.”

शरद पोंक्षे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही भरपूर काम केलं आहे.
याबरोबरच त्यांच्या मालिकांमधल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाने शरद पोंक्षे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
शरद पोंक्षे यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अग्निहोत्र, वादळवाट, कुंकू, असे हे कन्यादान, उंच माझा झोका या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय केले.

Web Title :- Sharad Ponkshe | sharad ponkshe says london militry school gives training of these 5 warrior from maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारिख