Shasan Aplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाअंतर्गत शिरूर तालुक्यात 33 हजारावर लाभार्थ्यांना लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या शिबिरात शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) ३३ हजार २२३ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सेवा व योजेनचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते (Sneha Kisave-Deokate) यांनी दिली. (Shasan Aplya Dari)

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांच्या वारंवार बैठका घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरापासून शिबिराला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व ९ मंडलस्तरावर सर्वप्रथम शिबिरे घेण्यात आले. यावेळी या शिबिरात सर्व सबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या विभागाशी संबंधित सेवा व योजनांबाबत माहिती देण्यात आली. (Shasan Aplya Dari)

 

विभागनिहाय देण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत शिबिरापूर्वीच प्रसिद्धी करण्यात आली. शिरूर नगरपालिकेद्वारे घंटागाडीमार्फतदेखील पत्रके वाटणे आणि ऑडिओ क्लिपद्वारे शिबिरे आणि योजनेची माहिती देण्यात आली.

विविध प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी संदर्भातील सेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नवीन शिधापत्रिका वाटप करणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे किंवा वाढवणे, आधार लिंक करणे, दुबार शिधापत्रिका देणे, प्राधान्य कुटुंब योजना किंवा अंत्योदय योजना यामध्ये पात्रतेनुसार लाभार्थींना सहभागी करून घेणे आदी महसूल संदर्भातील सेवा, पशुसंवर्धन विभागाचे लसीकरण व इतर योजनेचे लाभ देण्यात आले.

 

कृषि विभागामार्फत डीबीटीअंतर्गत विविध योजना, आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणीचे विविध शिबीरे,
आधार कार्ड वाटप, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान योजना लाभ, नगरपालिका मार्फत विविध सेवा, भुमिअभिलेख,
निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, जलसंपदा व पाटबंधारे विभाग
अशा विविध विभागांच्या योजनांचे लाभ एकाछताखाली देण्यात आले अशी माहितीदेखील किसवे देवकाते यांनी दिली आहे.

 

Advt.

Web Title :  Shasan Aplya Dari | 33 thousand beneficiaries benefited in Shirur taluka under the ‘Shasan Apna Dari’ programme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Solar Energy Projects | ऊर्जा निर्मितीमध्ये पुणेकरांचे ‘सौर’ उड्डाण 254 मेगावॅटवर

Adv Krupal Paluskar | केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड

Surraj Gurukul | कलाकारांसाठी ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क’ कार्यशाळा संपन्न