प्रेम प्रकरणातून तिने आई-वडिलांसह ८ जणांना पाजले विष 

वृत्तसंस्थाः

मामासोबत असलेल्या प्रेमसंबधातून एका मुलीने आपल्याच कुटुंबातील तब्बल आठ जणांवर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या काैशंबी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मामासोबतच्या प्रेमसंबधांमध्ये घरच्यांचा अडथळा होत असल्याच्या  कारणातून तिने हे कृत्य केले. रात्रीच्या जेवणामध्ये विषप्रयोग करुन तिने आई-वडिलांसह कुटुंबातील 8 सदस्यांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88844198-9ba8-11e8-a083-7f2bbe9f90d7′]
सकाळ झाल्यानंतर दररोज लवकर घराचा दरवाजा उघडणारे घर न उघडल्यामुळे शेजारील लोकांना संशय आला, त्यावेळी घरातील सदस्य बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.