Shehnaaz Gill | परदेशात जाऊनही शहनाज गिलने जपली भारतीय संस्कृती, ‘त्या’ कृतीचे होत आहे सर्वत्र कौतुक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हिंदी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नाव म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). अभिनेत्री शहनाज गिल हिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. शहनाजच्या स्वभावाचे, तिच्या वागणूकीचे नेहमीच कौतुक होत असते. मात्र शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) एका कृतीचे तिचे चाहते कौतुक करत आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाजचे साधे राहणीमान दिसत आहे. तिच्या या साध्य राहणीमानाचे तिचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.

 

शहनाज गिलचा एक व्हिडिओ ‘48 अवर्स इन दुबई’ (48 Hours in Dubai) या नावाने यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. शहनाज गिल नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त दुबईला गेली होती. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल दुबईमध्ये मस्तपैकी फिरताना दिसत आहे. मात्र यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते शहनाजच्या जमिनीवर बसून जेवण्याने. शहनाजला असे जमिनीवर बसून जेवताना पाहून सर्वजण थक्क झाले. तिच्या या कृतीवर चाहत्यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

 

शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) करिअर बद्दल बोलायचे झाले तर लवकरच सलमान खानच्या (Salman Khan)
‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka bhai Kisi ki Jaan Movie) या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा रंगली असून आता शहनाज आणि सलमान खानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत.

 

Web Title :- Shehnaaz Gill | shahnaaz gill dubai tour video got viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही