Shehnaaz Kaur Gill | सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच शहनाज पोहचली ‘अनाथ आश्रम’मध्ये, चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shehnaaz Kaur Gill | एकेकाळी मनोरंजन विश्वात चमकणारा चेहरा असलेला सिद्धार्थ शुक्ला आता फक्त आठवणींमध्येच राहीला आहे. सप्टेंबरच्या 2 तारखेला सिद्धर्थ शुक्लाने (Siddharth Shukla) त्याचा अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं अचानक निधन झालं. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.सिद्धार्थने आपल्या अभिनयाने आणि मनमोहकतेने लोकांची मनं जिंकली होती.

मात्र असं काहीही न बोलता तो निघून जाईल याची कल्पना कुणालाच नव्हती. त्याच्या जाण्याने प्रत्येकाला दुःख झालं. मात्र त्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अशातच सिद्धार्थची खास मैत्रीण अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) ही एक महिन्यापासून सोशल मीडिया आणि कॅमेरा पासून दुरावली होती. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाजला (Shehnaaz Kaur Gill) मोठा धक्का बसला होता.

 

 

शहनाज गिल

अशातच काही दिवसांपूर्वी शहनाज पुन्हा एकदा लोकांच्या समोर येऊ लागली आहे. बिग बॉस सीजन 13 (Bigg Boss 13) मध्ये सिद्धार्थ आणि शहानाजची ओळख झाली होती. तिथून त्यांच्यातली मैत्री इतकी वाढली की त्यांना ‘सिडनाज’ (#Sidnaaz) असं टॅग देण्यात आलं होतं. मात्र त्याच्या जाण्याने ही जोडी लोकांच्या पुन्हा कधीच नजरेस आली नाही.

 

सिद्धार्थचा वाढदिवस (Birthday) 12 डिसेंबरला आहे. यावर्षी तो ४१वा वाढदिवस साजरा करणार होता. मात्र तो आता हयात नसल्याने सर्वांना त्याची कमी जाणवते.
अशातच सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवसांपुर्वीच शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) अमृतसरमधील अनाथ आश्रममध्ये दिसली. अनाथ आश्रममधील (Orphanage) तिचे फोटो पाहून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

 

 

शहनाज गिल

वाढदिवसाच्या काही दिवस आधी अमृतसर मधील एका अनाथ आश्रम मध्ये शहनाजने मुलांसोबत वेळ घालवला आणि गप्पाही मारल्या. तिच्यासोबत सिद्धार्थची आई देखील होती. आता यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि चहाते त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत.

 

छवि

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंवर अनेक नेटकरांनी शहनाजला एक मजबूत मुलगी म्हणून वर्णन केलं,
तर अनेकांनी तिच्या प्रेमळ हृदयाची प्रशंसा केली, एक देवदूत आहे त्याला संपूर्ण जग मिळायला हवा,
अशी एका युझरने कमेंट केली आहे. शहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीला लोकांनी नेहमीच प्रेम दिले.

 

सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल

शहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीमधील केमिस्ट्री जबरदस्त होती.
या दोघांचे फोटोज आणि व्हीडिओज अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात.
यादरम्यान दोघेही एकमेकांसोबत लग्न करणार असल्याच्या देखील बातम्या पसरत होत्या.
मात्र ही खुशखबर चाहत्यांना मिळण्यापूर्वीच सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला.
सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाजची प्रकृती बिघडली होती. तिने बरेच दिवस खाणे पिणे ही बंद केलं होतं.
आता एक महिन्यानंतर ती कामावर परतली आणि तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

 

शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्ला

Web Title : Shehnaaz Kaur Gill | Shehnaaz Kaur Gill visit orphanage ahead sidharth shukla birth anniversary fans showered love

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे आणि ट्रॅक्टर; जाणून घ्या

Urfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात उर्फीनं परिधान केला चक्क फॉईल पेपर, नेटकऱ्यांकडून झाली ट्रोल ! नेटकरी म्हणाले – ‘अरे हिला कोणीतरी आवरा रे’