शेखर कपूरला ट्रोल करणं युजरला पडलं महागात, मिळालं जोरदार प्रत्युत्तर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिंदुस्तान युनिलिवर कंपनीनं अलीकडेच फेअर अँड लवलीचं नाव बदलून ग्लो अँड लवली केलं आहे. परंतु त्यांच्या या निर्णयानंतर डायेरक्टर शेखर कपूर संतुष्ट दिसले नाहीत. त्यांनी कंपनीच्या रिब्राँडिंगबद्दल सवाल केला आहे.

शेखर कपूर यांनी ट्विट केलं की, “आता तर फेअर अँड लवली ग्लो अँड लवली म्हणून संबोधली जाईल. कमॉन हिंदुस्तान लिवर. एवढ्या वर्षांपासून तुम्ही आमच्या भारतीय मुलींच्या डार्क स्किनवर कठोर कमेंट करत मोठा नफा कमावत होते. आता आपला हेतू सिद्ध करत आपल्या पॅकेजिंगमध्ये डार्क स्किन मुलीला घेऊन दाखवा.” शेखर यांच्या या ट्विटनंतर काहींनी तर त्यांनाच सवाल करत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका युजरनं शेखर कपूर यांनाच सवाल केला की, “आता तुम्ही तुमची प्रोफाईल वाढवण्यासाठी डस्की लोकांसाठी तोंड उघडत आहात. तुमच्या सिनेमातही कुठे कोणती डार्क स्किन हिरोईन होती.”

https://twitter.com/RaiK67776794/status/1278699585360232449?s=20

बहुतेक या युजरनं शेखर कपूर यांच्यावर वार करण्याआधी रिसर्च केला नव्हता. शेखर यांनी या युजरला नम्रतेनं एकाच शब्दात उत्तर दिलं. त्यांनी सिनेमाचं नाव लिहत म्हटलं, बँडिट क्वीन. त्यांचे हे उत्तर युजरची बोलती बंद करण्यासाठी पुरेसं होतं.

शेखर कपूर यांच्या बँडिट क्वीनला मिळाला होता बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड

बँडिट क्वीननं 1994 मध्ये बेस्ट फीचर फिल्मच्या कॅटेगरीत नॅशनल अवॉर्ड जिंकला होता. 1994 मध्ये कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये याचा प्रीमीयरदेखील झाला होता. बँडिट क्वीनला 67 व्या अॅकेडमी अवॉर्डमध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेजसाठी भारताकडून एन्ट्री मिळाली होती. सीमा बिस्वासनं फूलन देवीची प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.