Shinde-Fadnavis Government | ‘महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून एक एक प्रकल्प राज्याच्या बाहेर जाण्याचा सपाटा सुरू झाला’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवीन उद्योग उभारण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) प्रयत्न सुरु असतानाच केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राला अपयश आले आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारला पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र शिंदे सरकारने नेहमीप्रमाणे याचे खापर महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) फोडले आहे. शिंदे सरकारने यासाठी महाविकास आघाडीकडे बोट दाखविले आहे.

राज्यातील एक एक प्रकल्प राज्यातून बाहेर जात असून, ते थांबविण्यास शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकार अपयशी ठरत आहे. फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे सरकारला काहीच येत नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हंटले आहे. वेदांता फॉक्सकॉनसारखा प्रकल्प (Vedanta Foxconn) राज्याच्या बाहेर घालविल्यावर आता आणखी एक ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यापासून प्रकल्प बाहेर जाण्याचा सपाटाच सुरु झाला आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस (Tata Airbus), मेडिकल डिव्हाईस पार्क (Medical Device Park), बल्कड्रग पार्क (Bulkdrug Park), आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती करणारा प्रकल्प (Energy Device Manufacturing Project) राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळे राज्यातील रोजगार देखील गेला आहे. राज्यात रोजगार कसा निर्माण करणार, याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे नाही. राज्याला औद्योगिक विकासाच्या वाटेवर कधी आणणार, याचे देखील राज्य सरकारकडे उत्तर नाही, असे महेश तपासे यावेळी म्हणाले.

या प्रकल्पाची टाईमलाईन मविआ ची- देवेंद्र फडणवीस

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पाच्या (Energy Equipment Manufacturing Zone Project)
अपयशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘या प्रकल्पाची पूर्ण टाईमलाईन
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळातली आहे.
केंद्र सरकारने (Central Government) असे तीन पार्क करण्याचं ठरवलं आहे.
आता फक्त त्यातला एक दिला आहे. अजून दोन प्रकल्प यायचे आहेत.
केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रकल्प करत असते. सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले जातात.
पण त्यातल्या एका किंवा दोन राज्यांत ते प्रकल्प मंजूर होतात. प्रत्येक वेळी महाराष्ट्रातून ते प्रकल्प गेले,
हा कांगावा करणं चुकीचं आहे. त्यात महाराष्ट्राची बदनामी होते.’

Web Title :- Shinde-Fadnavis Government | eknath shinde devendra fadnavis led maharashtra government slammed criticized by ncp over industrial projects and investments going away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gujarat Elections | निवडणुकीआधी पुन्हा बाहेर आले 2002 चे भूत; भाजपकडून गुजरात दंगलीतील दोषीच्या मुलीला तिकीट

Navi Mumbai ACB Trap | अलिबागच्या लाचखोर महिला तहसीलदार मिनल दळवींकडे सापडले कोट्यवधींचं घबाड