Shirur Lok Sabha | खा. अमोल कोल्हेंना मत म्हणजे लोकशाहीला मत – बाळासाहेब थोरात

नारायणगाव : Shirur Lok Sabha | एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपने देशातील राजकरण बिघडवून आणि वेगळ्या वळणार नेऊन लोकशाही धोक्यात आणली आहे, मात्र आपल्या शिवजन्मभूमीचे सुपुत्र आणि शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी संसदेत दाखवलेला करारी बाणा म्हणजे या व्यवस्थेला दिलेलं सडेतोड उत्तर आहे, असं मत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलं आहे. ते शिरूर आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ नारायणगाव (Narayangaon Sabha) येथे आयोजित केलेल्या सांगता सभेत बोलत होते.(Shirur Lok Sabha)

पुरोगामी विचारधारेचे प्रणेते शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेच्या गप्पा मारणं सोपं आहे, मात्र या विचारांशी निष्ठा
ठेवून अविरत वाटचाल करणं अवघड आहे आणि हे दिव्य खा. कोल्हे यांनी पार पाडलं आहे.
स्वार्थ बाजूला ठेवून प्रवाहाच्या विरोधात व्यवस्थेला भिडणाऱ्या लढवय्या नेत्यांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव आदराने
घेतलं जातं असंही थोरात म्हणाले.

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाने देशातील शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालक अशा कोणाचंही हित जोपासलं नाही, मात्र त्यांच्या धोरणांवर डॉ. अमोल कोल्हे यांनी आसूड ओढण्याचं काम करून आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. देश संकटात असताना अनेकांनी आपला स्वार्थ पाहून भाजपा सोबत जाणं पसंद केलं मात्र खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेशी प्रतारणा न करता प्रवाहाच्या विरोधात जाणं पसंद केलं, त्यामुळे अशा निष्ठावंत मावळ्याला संसदेत पाठवणं गरजेच असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol’s Statement To Punekar | पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे पुणेकरांना निवेदन; म्हणाले – ‘पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविणार’

Pravin Tarde-Murlidhar Mohol | परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच…, मित्र मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंनी गाजवली सभा

Sharad Pawar On BJP Modi Govt | प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवरील संकट ! संसदेत कोल्हेंसारखं नेतृत्व असायलाच हवं : शरद पवार

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला ‘अच्छे दिन’ – मुरलीधर मोहोळ